maha dbt moafat battery pump yojana राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असता लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक अर्ज फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांनी सादर केले. आणि आज दि. 09/सप्टेंबर रोजी बॅटरी पंपाची लॉटरी लागली आहे.
एकात्मिक तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जात आहे. फवारणी पंपाच्या वितरण संखेच्या तुलनेत चार पाच पटिने अधिक अर्ज शेतकऱ्यांनी केले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या फवारणी पंप मिळणार नाही. लॉटरी पद्धतीने या फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. जे शेतकरी या मध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.
maha dbt moafat battery pump yojana फवारणी पंपाची अखेर लॉटरी लागली असून फवारणी पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार हि आशा तर मावळली आहे. लॉटरी द्वारे या फवारणी पंपाचे वितरण होणार असून लॉटरी पद्धतीने जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जाणार आहे.